ग्रामपंचायत खंबाळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

वृक्ष लागवड उपक्रम

black

शाळेच्या आवारात वृक्ष लागवड उपक्रम

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

black

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे

खंबाळे ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शाश्वत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

black

खंबाळे ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – खंबाळे ग्रामपंचायत

black

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

पाणी पुरवठा योजना

black

    1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती

    खंबाळे गावात सन १९८० पूर्वी झिरे, व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. सन २०१३-२०१४  मध्ये नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प वाकीखापरी धरणामध्ये खंबाळे  पुनर्वसन झाल्यावर गावासाठी  पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४०००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु सदर पाईप लाईनला गळती होऊन ती ग्रामपंचायत ने पंधरावित्त आराखडा मधून पाईप लाईन दुरुस्ती करण्यात आली. व गावांना वैयक्तिक नळ योजना या मधून देण्यात आली.व आज रोजी पाणीपुरवठा होत आहे.

    1. पाणी पुरवठा योजनेला जोडलेल्या महसुली गाव/वाडी, वस्ती यांची संख्या व नाव

    खंबाळे ता.इगतपुरी जि.नाशिक. खंबाळे व डहाळेवाडी हे महसुली गाव असून त्याअंतर्गत खंबाळेवाडी ,डहाळेवाडी ,शिदवाडी आणि वाघोबाची वाडी ह्या वस्त्या आहे